चिमूर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी स्वप्नील मालके यांची निवड
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - काँग्रेस पक्षाचे निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्ते स्वप्नील मालके यांची चिमूर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वप्नील मालके यांनी यापूर्वी पंचायत समिती चिमूर येथे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कार्य केले असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची पक्षातील विश्वासू आणि अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाशी प्रामाणिकपणा कायम ठेवला आहे. पक्षाशी कधीही गद्दारी होणार नाही, याची जाणीव ठेवून ते भविष्यातही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करतील, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!