गुरुकुल CPS क्लासेसची यशाची परंपरा कायम!

'उत्तुंगतेज बालवैज्ञानिक' परीक्षेत श्रेयशी चव्हाण जिल्ह्यात प्रथम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१८/०५/२०२६
स्थानिक गुरुकुल CPS क्लासेस आणि वैनगंगा विद्यालयाची इ.८ वीची विद्यार्थिनी श्रेयशी विवेक चव्हाण हिने 'उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत'भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या दैदिप्यमान यशामुळे पवनी शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २९ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली होती,ज्याचा निकाल १७ मे रोजी जाहीर झाला.श्रेयशीने यापूर्वी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'NMMS' परीक्षेतही जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.आता सलग दुसऱ्या मोठ्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल येत तिने आपली उज्ज्वल गुणवत्ता आणि बौद्धिक क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
पुढील टप्प्यासाठी निवड आणि मिळणारे लाभ:
जिल्ह्यात प्रथम आल्यामुळे श्रेयशीची या परीक्षेच्या पुढील महत्त्वाच्या टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी (Interview) निवड झाली आहे. 'बालवैज्ञानिक शिष्यवृत्ती' अंतर्गत तिला खालील सुवर्णसंधी व लाभ मिळणार आहेत:
 ₹१०,००० रोख शिष्यवृत्ती.
 पाच दिवसीय वैज्ञानिक अभ्यास दौरा.बालवैज्ञानिक पुरस्कार, अधिकृत प्रमाणपत्र व सुवर्ण पदक.
 इस्रो' (ISRO) च्या ज्येष्ठ वैज्ञानिकांकडून थेट विशेष मार्गदर्शन.
गुरुकुल CPS क्लासेसची यशाची परंपरा:
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुकुल CPS क्लास,पवनी येथील विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत क्लासच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.क्लासचे संचालक रवी भिसेकर यांच्या अचूक नियोजन आणि मोलाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
यशाचे श्रेय आणि सत्कार: श्रेयशीने आपल्या या उत्तुंग यशाचे श्रेय वैनगंगा विद्यालयातील शिक्षक,आपले माता-पिता आणि परीक्षांची उत्कृष्ट तयारी करून घेणारे गुरुकुल क्लासेसचे संचालक रवी भिसेकर यांना दिले आहे.
श्रेयशीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गुरुकुल CPS क्लासेस,पवनी तर्फे तिचा जाहीर सत्कार करण्यात आला असून,तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!