भिसी पोलीसांनी ३९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जाप्त
भिसी पोलीसांची मोठी कामगीरी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - पोलीस स्टशेन भिसी हददीत मौजा जाभुळघाट येथे वाहनामध्ये अवैद्य गोवंशीय वाहतुक करणाऱ्याविरूध्द स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन भिसी यांची संयुक्त कार्यवाही करत दिनांक १७/०५/२०२६ रोजी ०७.१० वा. एका मागोमाग एक असे ०४ पिकअप वाहन पकडून भिसी पोलीसानी ३९ लाख ६० हजार रुपयांचा अवैध जनावरे व पिकअप जप्त केले .
जांभुळघाट रोडने एकामागे एक असे एकुण ०४ पिकअप वाहने उभी झाली. १) दिपक योगराज कांबळे, वय २५, राह. किटाळी, ता. लाखणी, जि. भंडारा, २) मधुकर सोमाजी समरत, वय ६६, राह. काथुर्ली, ता. पवनी, जि. भंडारा, ३) हरिदास तुलाराम माहुरे, वय ३०, राह. भावड, ता. पवनी, जि. भंडारा, ४) राजहंस आत्माराम नागपूरे, वय ४६, राह. नेहरू वार्ड, पाथरी, ता. पवनी, जि. भंडारा, ५) राजकुमार दाजीराव मारबते, वय ३३, राह. पाथरी, ता. पवनी, जि. भंडारा, ६) चैतन्य विठ्ठल गजापुरे, वय २८, राह. विरली खंदार, ता. पवनी, जि. भंडारा, ७) गंगाधर रामकृष्ण मस्के, वय ४२, राह. कातुर्ली, ता. पवनी, जि. भंडारा, यांची चौकशी केली असता त्यामध्ये गोवंशीय बैल पांढरे/धवरे, लाख्या रंगाचे एकुण- १२ गोवंशीय बैल दोरखंडाने दाटीवाटीने बांधुन दिसले, गोवंशीय बैलाची वाहतुक करित असतांना चारही पिकअप वाहनामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक उपाय योजना केलेली दिसुन आली नाही. तसेच गोवंशीय जनावरे बैलांची योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच चारा, पाणी उपलब्ध नसल्याचे दिसुन आले. वरील चारही वाहनांपैकी कोणत्याही वाहन चालकाकडे गोवंशीय जनावरे वाहतुक करित असतांना पशुधन विकास अधिकारी/पशु वैद्यकीय अधिकारी यांचे जनावराची वाहतुकी करिता प्रमाणपत्र सोबत बाळगले नाही, तसेच आरटीओ विभागाकडुन वाहनात जनावरे वाहतुकीचे परवानाबाबत विचारणा केली असता
१) एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क्रं. एम.एच.-३४-एव्ही-१५८० कि.अं. ९,००,०००/-रू. २) एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन के. एम. एच.-४०- एके-१०३६ कि.अं. ९,००,०००/-रू. ३) एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन के. एम.एच.-.-३४- बीजी-६७८१ कि. अं. ९,००,०००/-रू. ४) क पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन कं. के. एम. एच.-४० वाय-७५९४ कि. अं. ९,००,०००/- रू व त्यात प्रत्येकी ३ जनावरे एकुण १२ जनावरे (बैल) कि अंदाजे ३,६००००/- रूएकुण ३९,६०,०००/- रू. चा माल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला असुन यातील वर नमुद ७आरोपीतांविरूध्द कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) भारताचा प्राण्यांना कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, सहकलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारीत सन २०१५अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर १२ जनावरे यांना गोंदेडा येथील गोशाळेमध्ये संरक्षणकरीता ठेवण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभा. पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक मंगेश भोंगाडे, ठाणेदार भिसी, पोउपनि/रविंद्र वाघ, पोउपनि / सर्वेश बेलसरे, स्थागुशा, पोहवा / ८११ नितीन कुरेकार, पोहवा / २५५५ प्रमोद कोटनाके, पो.अ./९९ अमोल साव, चालक पोहवा / २३१० दिनेश अगडे, पो.अ./१२६९ रेखलाल पटले, पो.अ./२००२ साद शेख सर्व पो.स्टे. भिसी जि. चंद्रपूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!