स्वप्नझेप अकादमीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी झेप; एसआरपीएफ व महाराष्ट्र पोलिस दलात निवड




तळोधी (बा) ;-
   ग्रामीण भागातील युवकांच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा देणाऱ्या स्वप्नझेप अकादमी, तळोधी बाळापूरच् या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटविली आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर अकादमीतील तीन विद्यार्थ्यांनी एसआरपीएफ व चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात यशस्वी भरारी घेत परिसराचा मान उंचावला आहे.
मरेगाव ( तह.मुल) येथील रोहित गुरनुले गोंदिया जिल्हा येथे एस आर पी एफ म्हणून निवड , तसेच आंबोली (तह.सिंदेवाही) येथील शुभम मंडलवार यांची एसआरपीएफ, चंद्रपूर येथे निवड झाली असून, वासेरा (तह.सिंदेवाही) येथील राकेश झोडे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात स्थान मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. यापूर्वी ते गृहरक्षक दलात काम केले होते.त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे स्वप्नझेप अकादमीचे मार्गदर्शक विकास सर, पराग सर आणि नितीन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासासोबतच शारीरिक तयारी, मानसिक बळ आणि स्पर्धा परीक्षेचे अचूक नियोजन यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाची पंखे लाभली.
स्वप्नझेप अकादमी आज ग्रामीण युवकांसाठी आशेचा दीप बनली असून, अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तळोधी बा,सि्देवाही परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही अकादमीचे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत आपली छाप उमटवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!