सावलीचे भूमी अभिलेख कार्यालय वाऱ्यावर - पुनर्मोजनीचे तक्रार अर्ज ३-४ वर्षांपासून प्रलंबित @ उपधीक्षकांचे दर्शन दुर्लभ
सावली - जमिनीच्या क्षेत्राबाबत वाद असल्यास दुरुस्ती प्रकरण दाखल केल्या जातात मात्र दप्तर दिरंगाई कायदा फाट्यावर ठेवण्याचे काम सावली भूमी अभिलेख कार्यालयाकडून होत असल्याचे दिसते व उप अधिक्षकांचेही दर्शन होत नसल्याने कार्यालय वाऱ्यावर असल्याचा अनुभव तालुकावासियांना येत आहे.
अनेकदा जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत असल्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. या हाणामाऱ्या शासकीय यंत्रनेच्या दुर्लक्षपणामुळे घडलेल्या आहेत. सावली तालुका भूमी अभिलेख कार्यालयात उप अधिक्षकांचे पद कायम प्रभारीच्या भरोस्यावर आहे. सद्या गोंडपिपरीचे उप अधिक्षक अरुण वऱ्हाडे यांचेकडे सावलीचा प्रभार आहे. मात्र ते सावली कार्यालयात शेतकऱ्यांना दिसलेच नाही. जमीन पुनर्मोजणी तक्रार प्रकरणे ३-४ वर्षांपासून प्रलंबित आहेत याबाबत कार्यालयात विचारणा केली तर तुमच्यापेक्षा जास्त कालावधीची प्रकरणे प्रलंबित असल्याचे कौतुकाने सांगतात, मोजणी प्रकरणे कालमर्यादेत निकाली काढल्या जात नाही, मोजणीच्या तारखेस मोजणी अधिकारी गैरहजर राहतात, मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोजणी क प्रत वेळेत मिळत नाही अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. मात्र उप अधीक्षकांचेच दुर्लक्ष असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक कोण ठेवणार?. याकडे वरिष्ठानी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!