वरोरा तालुक्यात करोडोचा आयपीएल सट्टा वरोरा मधील मुख्य सूत्रधार याकडे लक्ष देणार कोण?
वरोरा तालुक्यात करोडोचा आयपीएल सट्टा
वरोरा मधील मुख्य सूत्रधार याकडे लक्ष देणार कोण?
वरोरा तालुका अंतर्गत आयपीएल सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असून वरोरा येथीलच मुख्य चालक हा राजरोसपणे करोडो रुपयांच्या बेट स्वीकारत असून त्यांचे एजेंट तालुक्यात ठीक ठिकाणी कार्यरत आहे. मात्र जिल्ह्याचे नुकताच रुजू झालेले दबंग पोलीस अधीक्षक हे या सट्टा बजांच्या व युवा पिढीला बरबाद करण्यात कारणीभूत असलेल्या या सट्टेखोरांच्या मुसक्या आवळतील का ? असा प्रश्न युवा पिढीतील आई-वडिलांना पडलेला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील आई पी एल चा मुख्य सूत्रधार हा वरोऱ्यातुन असून मुक्तपणे आपल्या अवैध व्यवसाय करतो आहे. तसेच शेगाव मध्ये एका मोबाईल शॉपी दुकानचालक मोठ्या प्रमाणात लाखोच्या घरात आयपीएल सट्टा होळ घेत असून हा सगळा खेळ मोाइलद्वारे सुरू आहे.
हा सट्टा मॅचेस टाँस, पासून ते ओवर बॉल, बॉलर, या पर्यंत लागले जात असून हजारो ते लाखो रुपये पर्यंत होळ ही घेतली जाते .मात्र विशेष म्हणजे काही सट्टेबाज हे स्थानिक वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असून सुद्धा घाबरत नसल्याचे चित्र दिसत आहे. वरोरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यापासून अनभिज्ञ कसे? हा एक मोठा गंभीर प्रश्न बनलेला आहे विशेष म्हणजे शेवटच्या तीन सामने उरलेल्या असून यावर करोडोची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या आय. पी. एल. सट्टे घेणाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित असून चंद्रपूर (दबंग) पोलीस अधिक्षक वरोरा पोलीस व एलसीबी टीम यांनी या सट्टेबाजांना शोधून यांच्यावर कारवाई करण्यात कितपत यश मिळवणार हे बगणे महत्वाचे ठरणार आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!