मका पिकाला लागलेली आग विझवितांना शेतकऱ्याचा मृत्यू - सोनापूर गावात शोककळा
सावली - तालुक्यातील सोनापूर येथे मक्याच्या शेतात लागलेली आग विझवितांना साईनाथ नामदेव उडान (वय ४२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
शेतातील काडी कचरा जाळण्याचे काम सर्वाकडे सुरु आहे. त्यातच सोनापूर शेतशिवारात कुणीतरी आपल्या शेतात आग लावली मात्र ही आग साईनाथ उडान यांच्या मका काढून असलेल्या शेतापर्यंत पोहचली. आपल्या डोळ्यासमोर हाती आलेले पीक जळताना पाहून त्यांनी विझविण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारची वेळ असल्याने आग आटोक्यात आली नाही. आगीचे व उन्हाचे चटके बसल्याने त्याला गडचिरोली रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!