शेगाव बु येथे लाखोचा आयपीएल सट्टा

सट्टा घेण्यात काका, पुतण्याची जोडी आघाडीवर
 
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव बु पोलीस स्टेशन अंतर्गत आयपीएल सट्टा अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू असून सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक शेगाव येथीलच एका काका, पुतण्याची जोडी पासिद्ध आहे.मोठ्या प्रमाणात लाखोच्या घरात आयपीएल मॅचेसवर होळ घेत असून हा सगळा खेळ मोाइलद्वारे सुरू आहे.  आयपीएलच्या मॅचेस काही शिल्लक राहिले असून एक एका सट्टाबाजाराकडून वेगवेगळ्या  मॅचेस वर प्रति ओवर ,प्रति बाँलवर हजारो ते लाखो रुपये पर्यंत होळ हि घेतली जाते मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्गही आहारी गेला असून अनेकांचे आई-वडील त्रासून गेलेली आहे,या आयपीएल सट्टा बाजारावर अंकुश लावण्यात शेगाव पोलीस या पासून अनभिज्ञ कसे?  हा एक मोठा गंभीर प्रश्न बनलेला आहे विशेष म्हणजे शेवटच्या काही सामने उरलेल्या असून यावर करोडोची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या काका पुतण्याच्या जोडीवर कारवाई होणे अपेक्षित असून शेगाव पोलीस व एलसीबी टीम यांनी या सट्टेबाजांना शोधून यांच्यावर कितपत यश मिळवणार हे पाहणे परिसरात महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!