शेगाव येथे भव्य मोफत नेत्र व स्त्रीरोग तपासणी शिबीर

रोटरी क्लब व गजानन क्लिनिक शेगाव यांचा उपक्रम 

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - दि. २७ मे २०२६ ला गजानन क्लिनिक मेडिकल चौक  शेगाव बु येथे रोटरी क्लब वरोरा व गजानन क्लिनिक शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा नेत्र तपासणी, दांत तपासणी आणि स्त्री रोग तपासणी या वर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या तपासणी शिबिर साठी नेत्र रोग तज्ञ डॉ. निखिल लांबट हे असनार असून, दंत तपासणी साठी डॉ. स्नेहदिप रामटेके हे असणार आहे. तसेच स्त्री रोग तासणी साठी डॉ. प्रणाली कामडी हे असणार असून गरजूंना मात्र १०० रुपये मधे डोळ्यांचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
त्यामुळे या शिबिराचा लाभ गावातील तसेच परिसरातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन गजानन क्लिनिक मेडिकल चौक शेगाव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!