महाराष्ट्रात धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी साहेब आता चिमूरकडे लक्ष देणार?

सुगंधित तंबाखू,वाळू माफिया, अवैध कोळसा, मुरूम तस्कर आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धागेच दानाणले 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - महाराष्ट्र राज्यात आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे नावारूपास आलेले चंद्रपूर जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. कायद्याचा धाक निर्माण करणारे, गुन्हेगारांना थेट जेलची हवा दाखवणारे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वाळू माफिया, अवैधरित्या दगडी कोळसा विक्री करणारे टोळके, मुरूम माफिया, दोन नंबरचे व्यावसायिक तसेच कुख्यात गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करून त्यांनी प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहज जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात ठोस भूमिका मांडणारे अधिकारी म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते.

चिमूर विधानसभा क्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांचे जाळे वाढत असल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये आता एकच अपेक्षा व्यक्त होत आहे की, पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी साहेब स्वतः लक्ष घालून त्यांनी विशेष भरारी पथक नियुक्त केल्याचे कळले आहे परंतु भरारी पथक व अवैध व्यावसायिक जसे कि सुगंधित तंबाखू विक्रेता यांच्या साठगाठीनेच चिमूर विधानसभा क्षेत्रात तळोधी वाढोणा येथे सुगंधित तंबाखूचा कारखाना असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

स्थानिक स्तरावर वाळू चोरी, अवैध मुरूम उत्खनन, दगडी कोळशाची बेकायदेशीर वाहतूक, सुगंधित तंबाखू विक्री आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वाढता प्रभाव यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. मात्र “नेपाणी पॅटर्न” लागू झाल्यास अनेक अवैध धंदे एका रात्रीत बंद पडतील, अशी चर्चा चहाटळ्यांपासून गावागावांत सुरू आहे.

विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी साहेब यांच्या नावानेच अनेक अवैध व्यावसायिकांमध्ये धडकी भरत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जर चिमूर विधानसभा क्षेत्रात विशेष मोहीम उघडली गेली तर अनेक मोठे चेहरे समोर येतील आणि वर्षानुवर्षे सुरू असलेले अवैध साम्राज्य उद्ध्वस्त होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.

सामान्य जनतेत कायद्याबद्दल विश्वास निर्माण करून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणारे अधिकारी म्हणून आयुष नेपाणी साहेब यांचे नाव आज महाराष्ट्रभर गाजत असून, आता चिमूर विधानसभा क्षेत्रात त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!