मूल येथे काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन
मूल येथे काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन; स्मृती दिन संपन्न
मूल (प्रतिनिधी):
भारताचे माजी पंतप्रधान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक स्व. राजीवजी गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त मूल काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. आज, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थानिक काँग्रेस भवन, मूल येथे या स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस आदरणीय संतोषसिंह रावत (माजी अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पुष्प अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी देशाच्या विकासात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्व. राजीव गांधी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे स्मरण करण्यात आले.
या अभिवादन प्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावर, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला शहर अध्यक्ष नलिनी अडपवार, नगरसेवक विवेक मुत्त्यालवर, तुकाराम गुरुनुले, बंडू गुरुनुले, सौ. समीक्षा कडसकर, सौ. ज्योती चटारे, सौ. चंदा कामडी, किसन शेरकी, गणेश मेश्राम, रागिणी कोपुलवार यांच्यासह काँग्रेस कमिटीचे इतर सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!