प्रामाणिक सेवेला मिळाला सन्मान — नैताम मॅडम API पदावर विराजमान



चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पीएसआयची एपीआयपदी पदोन्नती
चंद्रपूर : राज्य शासनाच्या पदोन्नती धोरणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशी आणि पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांच्या मंजुरीनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले.
शासनाच्या ७ मे २०२१ च्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठतेच्या आधारे ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. सन २०२४-२५ साठी विभागीय पदोन्नती समितीने पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार केली होती. याआधी राज्यभरातील ३४१ पोलीस उपनिरीक्षकांना एपीआय पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर प्रलंबित व मोहोरबंद प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले.
पुनर्विलोकनानंतर आणखी ४८८ पात्र पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदासाठी मंजुरी देण्यात आली असून, महसूल संवर्ग वाटप नियमांनुसार त्यांच्या पदस्थापना निश्चित करण्यात आल्या आहेत.
या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील अभिषेक प्रभाकर जंगमवार, वर्षा तुकाराम नैताम, दीपक भाऊराव ठाकरे, सचिन विनायक मुसळे आणि मनोज विलासराव वासाडे या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना कार्यभार स्वीकारल्यानंतर एपीआय पदाचे अधिकार व जबाबदाऱ्या लागू होणार आहेत. या पदोन्नतीमुळे जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यास मदत होईल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!