नागभीड तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची मालिका सुरूच तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या किटाळी मेंढा येथील इंदिरा उईके यांच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
नागभीड :- तालुक्यातील किटाळी मेंढा वनपरिक्षेत्रात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या इंदिरा उईके या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक १९ मे २०२६ ला सकाळी ९ वाजता घडली आहे. किटाळी मेंढा जंगल परिसरात महिला जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेली होती. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर झडप घातली व त्या वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण या भीषण घटनेमुळे किटाळी मेंढा आणि परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सध्या तेंदुपत्ता हंगाम सुरू असल्याने मजूर आणि नागरिक मोठ्या संख्येने जंगलात जातात. मात्र या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे या नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना एकटे जंगलात न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!