कीटकनाशक फवारणीने उन्हाळी धान पीक धोक्यात - शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार
सावली : उन्हाळी धान पिकावरील रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी केंद्रातून औषधी आणली व धान पिकावर फवारणी केली मात्र रोग बरा होण्याऐवजी धानाची मुदत होऊनही निसवा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. असा प्रकार पेंढरी मक्ता येथील शेतकरी गणेश अल्लूरवार यांच्या बाबतीत घडला असून १२ एकरच्या धानपीकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांचेकडे शेतकऱ्याने केली आहे.
पेंढरी मक्ता येथील शेतकरी गणेश अल्लूरवार यांनी सावली येथील कृषी केंद्रातून १२ एकर धानपिकावर १५ दिवसापूर्वी फवारणी केली. रोग तर बरा झाला नाही मात्र धानपिकाचा कालावधी पूर्ण झाला असतांनाही निसवा झालेला नाही. उन्हाळी धानपीकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून काही कालावधीत हातात येणारा पीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कीटकनाशकामुळे शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेला आहे. त्यामुळे चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीची तक्रार औषधी खरेदी बिलासह तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!