बस स्थानक परिसरात पानपोई चा अभाव

गरोदर महिला, लहान मुले, वयो वृद्ध नागरिक, विद्यार्थी यांची कुचंबना

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - एप्रिल महिना सुरू होताच आभाळातील सूर्याच्या ज्वाला जणू काही पृथ्वीला भाजून काढत आहे आणि त्या ज्वालांच्या छायेखाली परिसरातील जनता प्रवास करताना आपल्याला लागलेल्या तहानेची वेदना हृदयात दाबून प्रवास करण्यात मग्न आहे. तालुक्यातील परिसरात विद्यार्थ्यांची शाळा सुरू असून आदी गावोगावी सामाजिक बांधिलकीतून उभारल्या जाणाऱ्या पानपोई जिथे एखाद्या घोटातही माणुसकीचा गारवा जनतेला मिळायचा त्या आता फक्त आठवणी उरलेले आहे.तालुक्यातील शेगाव मध्ये तहान भागवण्यासाठी  प्रवाशांना हॉटेलकडे धाव घेऊन 10 ते 20 रुपयाची थंड पाण्याची बॉटल घेऊन तहान भागवावी लागत आहे, शेगाव हे वरोरा तालुक्यातील मोठे गाव असून 353 ई राज्य मार्गावर बसलेले आहे गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे या गावाला परिसतील 50 ते 60 खेडे जोडलेले आहे या ठिकाणी दवाखाना, पोलीस स्टेशन,शाळा, विद्यालय, बँक, विद्युत कार्यालय, बाजार समिती, किराणा, कपडा, दुकान, हार्डवेअर दुकान, मेडिकल, आदी व्यापारी लाईन आहे. परिसरातून वेगवेगळ्या कामाकरीता येणाऱ्या नागरिकांची दिवसभर हलचल याठिकाणी पाहायला मिळते मात्र दिवसभर  वेगवेगळ्या कामातून थकलेल्या शरीराला थंड पाण्याच्या थेंबही साथ देत नाही, या ठिकाणी गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक,शेतकरी, वृद्ध महिला, विद्यार्थी, मजूर प्रवासी गावाकडे प्रवास करताना बस स्टॉप परिसरात तासोन तास उभे राहुन सूर्याचे प्रखर चटके सहन करत लखलखत्या उष्णतेच्या मनात घुट पिऊन, हॉटेल मधून दहा ते वीस रुपयाची बॉटल विकत घेऊन गावाकडे निघून जात आहे. पूर्वी सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप वर पाणपोई आपल्या स्वखर्चातून उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपून ठेवायचे आता मात्र हे दिसून येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!