सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन चा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा नागभीड येथे हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती ;

सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन चा  उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा
नागभीड येथे हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती ;

तळोधी (बा.) प्रतिनिधी:-
   सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने नागभीड येथील एस. एन. बी. सेलिब्रेशन  सभागृह नवखडा येथे मंगळवारी दि. 7 चंद्रपूर जिल्ह्याचे व तालुक्यातील शाखाचे उद्घाटन सोहळा संस्थेचे संस्थापक मनोज कुमार डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
   यावेळी कार्यक्रमाच्या  प्रमुख पाहुणे म्हूणन फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश निकम,सचिव संजय सतई, टेक्निकल हेड अरविंद पोटे, जिल्हाध्यक्ष संजय कुथे, नागभीड तालुका अध्यक्ष विक्रांत गजपुरे, नागभीड महिला अध्यक्ष कानिजा शेख, ब्रह्मपुरी ता. अध्यक्ष आरती कुथे, चिमुर तालुका अध्यक्ष माधवी येळणे, चिमूर ता. अध्यक्ष  रामराज पंचभाई,वरोरा ता. अध्यक्ष वासुदेव डोमकावळे, मूल ता. अध्यक्ष मनोज कोरडे, मुल तालुका अध्यक्ष पारुल मंडल, वरोरा ता. अध्यक्ष  ममता वेलगंडावर, माधवी थेकने, विभागीय प्रमुख राहुल रामटेके, सुभाष गजभे, टोमदेव बोरकर, पूनम बोरकर, सचिन काळेश्वर, वृषाली गजपुरे, छत्रपती बघमारे, निलेश बागडे, वैशाली माकडे, दिवाकर निकुरे, गजानन भुरले, बरकत शेख, आदी उपस्थित होते.
 सैनिक शेतकरी वेल्फेअर  फाउंडेशन वतीने  ब्रह्मपुरी, नागभीड, वरोरा, चिमूर, मूल, या तालुक्यामध्ये 500 अधिक शाखेचे शुभारंभ करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती होती. दरम्यान सैनिक शेतकरीचे संस्थापक मनोजकुमार डांगे यांनी  आपल्या मार्गदर्शन सांगितले की, पहिली संस्था आहे की, सैनिक शेतकऱ्याबरोबर ग्रामीण होतकरू गरीब महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नच नाही तर कंबर कसली आहे. महिलांसाठी आर्थिक फायदे  आणी मिळणारे अनेक लाभ याबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच फाउंडेशनच्या 11 योजना बद्दल माहिती दिली. यावेळी मुलगी जन्माला आली आणी कुटुंबातील नैसर्गिक मृत्यू झालेल्या अश्या 6 कुटुंबाला 5000 रुपयाचे धनादेश  वाटप करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य जनजागृती अभियान आरोग्य यौद्धा यांच्या सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू डडमल तर आभार सुभाष गजभे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!