कोंडेखलचे नागरिक धडकणार पंचायत समितीला - ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची करणार मागणी
कोंडेखल ग्रामपंचायतमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पंचायत समितीकडे केली होती. त्यानुषगाने विस्तार अधिकारी संजीव देवतळे यांनी चौकशी केली असता न केलेल्या कामाचा खर्च दाखवून निधीचा अपहार केल्याचे दिसून आल्याने सरपंच सरला कोटगले व दोन्ही ग्रामसेवकांकडून समप्रमाणात रक्कम वसुल करणे, विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी धीरधम्म रायपुरे व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आनंद देवगडे यांनी कसूर केल्याने त्यांचेवर जिल्हा परिषद कर्मचारी शिस्त व अपील १९६४ कलम ४ नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ते पाहता फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक असतांना फक्त रायपुरे या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचा पूर्वीचा इतिहासही आर्थिक घोटाळ्याचा असून हे तिसऱ्यांदा निलंबित झाले आहे. लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याने गावातील विकास कामांवर परिणाम झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणे गटविकास अधिकारी यांना फौजदारी तक्रार करण्याचा अधिकार असल्याने येथील सरपंच सरला कोटगले, तत्कालीन ग्रामसेवक आनंद देवगडे व विद्यमान ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महिन्याभरापूर्वी गावाकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र गटविकास अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंचायत समिती सावली येथे १६ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा इशारा विजय कोरेवार, श्रीकृष्ण बोदलकर, रोशन वालदे यांनी पत्राद्वारे दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!