नऊ वर्षापासून प्रलंबित 353 ई रोड आणखी रखडला

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री यांच्या हस्तक्षेपानंतरही दोन वर्षापासून रोडचे बांधकाम अपूर्णच

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई  हा मागील ९  वर्षापासून अतिशय कासवगतीने काम सुरू असून अद्यापही रस्त्याचे काम पूर्णपणे झालेले नाही या ठिकाणची काम करणारी कंपनी रस्त्याचे काम अर्धवट सोडून गेली असून. आदी हे काम SRK कंपनी करीत होती परंतु SRK कंपनीने आपले काम नियमित कालावधीत पूर्ण नं केल्यामुळे  नागपूरच्या KCC कंपनीला या रोडचे काम देण्यात आले होते, परंतु मागील दोन महिन्यापासून KCC कंपनीने सुद्धा रोडचे काम सोडलेले असून या 353 ई राष्ट्रीय महामार्गाचे काम आता रामभरोसे झालेले आहे. शेगाव वरोरा रोडवर सालोरी जवळ सुरू असलेले काम बंद करून कंपनी तिथून निघून गेलेली आहे त्यामुळे नऊ वर्षापासून प्रलंबित महामार्ग आणखी किती वर्षे घेणार?  असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे.त्यातच या महामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून  महामार्गाचे काम हे सुद्धा निकृष्ट पद्धतीचे झाले असल्याचे जनतेमध्ये बोलल्या जात आहे. 
सालोरी या ठिकाणी अगदी वळणावर जिथे कंपनी काम सोडून गेली तिथे धोकादायक वळण  बनवले असल्यामुळे रोज किरकोळ अपघात होत असतात. या ठिकाणी एक वाहन रस्ता क्रॉस करताना दुसऱ्या वाहनाला थांबून राहावे लागते तसेच वळण असल्याबाबत कुठेही सूचनाफलक नसल्याने कित्येक वेळा रात्रीला वाहन चालकाला लक्षात न आल्यामुळे वळण न घेता सरळच गेल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार कधी?  असा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे व लोकप्रतिनिधी हे का फक्त निवडणुका पाहूनच कामाचा धुमाकूळ करतील का?  असा सतप्त सुर जनतेमधून निघत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!