महुआ फुलांमुळे ग्रामीणांना रोजगार; मात्र वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण
रस्त्यालगत वृक्ष लागवड करण्याची गरज
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - जंगलातील गावालगत उपलब्ध असलेल्या महुआ फुलांमुळे ग्रामीण व आदिवासी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असला, तरी सध्या परिसरात वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माघ फाल्गुन महिन्यात महुआ फुले वेचण्यासाठी आदिवासी सूर्योदय अगोदर पहाटे व सायंकाळी मोहा फुले वेचायला जात असुन वाघाच्या ठिकठिकाणी हालचाली वाढल्याने रोजगारावर सावट पसरलेले आहे.
आदिवासी महुआ फुले वाळवून त्यांची विक्री करून रोजगार मिळवत असतात तसेच झाडाच्या पानापासून लग्न,
ईतर कार्यक्रमाकरिता पात्र, द्रोण तयार करून बियांपासून औषधी , खाद्यपदार्थ व पेये तयार केली जात असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहावर संकट उभे राहिले आहे विशेषतः या कामात महिलांचा मोठा सहभाग असून त्यांना घराजवळच रोजगाराची संधी उपलब्ध होत असते स्थानिक बाजारपेठेत महुआ फुलांना चांगली मागणी असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळुन कुटुंबाला आधार मिळायचा मात्र अलीकडील काळात ग्रामीण परिसरात वाघ दिसण्याच्या घटना वाढल्या असून काही ठिकाणी जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकजण जंगलात जाणे टाळत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदिवासी समाज मोहुआ झाडाला खूप महत्त्व देत असून आजही संस्कृतीमधील घरातील सगळेच कार्यक्रम, देविदेवतची पूजकरीता झाडांच्या फळांचा वापर करत असतात तसेच पाळीव प्राण्याला बिमारी मध्ये खाद्य देवुन फुलांचा वापर करत असतात, हे कल्पवृक्ष असून आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्याचे जाळे पसरले असून रस्त्यालगत मोह आ झाडाचे वृक्षारोपण होणे आवश्यक आहे, हे झाड अनेक वर्षे जिवंत राहत असून ग्रामीण परिसरात रोजगाराला मदत होईल तसेच याच्या फांद्या सरपण म्हणून वापर सुद्धा केला जाऊ शकतो त्यामुळे जंगलामध्ये जाणे कमी होऊन मानव वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!