अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे मिळवण्यासाठी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात अनेक वर्षापासून शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत शासनाकडून शेतीचे पट्टे मिळाले नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वाहत असलेल्या शेतीचे शासनाकडून पट्टे मिळण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करत मागणी केलेली आहे.वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वायगाव भो. येथील शेतकरी सन 1965 ते 1970 पासून अतिक्रमण करून शेती वाहतूक करून आपला कुटुंबाच्या उदरनिर्वाह करत असुन वारंवार तहसील कार्यालय,जिल्हा कार्यालय येथे कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा शासनाकडून अजून पर्यंत त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्याने आजही ते योजने पासून वंचित राहिलेले आहे त्यामुळे वन जमिनीचे पट्टे तात्काळ देण्याची मागणी प्रहार जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनात राजेश रेभनकर, नथुजी जांभुळे, किसन जांभुळे, मधुकर आत्राम, नथुजी गजबे, दत्तूजी गजभे या शेतकऱ्यांनी केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!