अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू,ओळख पटली नाही
भिसी पोलिस स्टेशन मध्ये मर्ग नुसार गुन्हा दाखल
ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पोलीस स्टेशन भिसी च्या हद्दीत समोर आली.मात्र मृत्यू झालेल्या इसमाच्या जवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे,ओळखपत्रे आढळून आली नसल्याने,"सदर इसम कुठला आहे हे सध्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले नाही.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपघात अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आल्याने भिसी पोलिस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक ११४/२०२६,कलम २८१,१०६ (१) भान्यासं सहकलम १३४,१८४ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे नाव,सरकार तर्फे सतीश पंढरी जिवतोडे,धंदा-नौकरी (पोलीस अंमलदार, ब.नं. १३८३) पो.स्टे भिसी,जि.चंद्रपूर असे आहे.सदर अपघात प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोउपनि.रविंद्र वाघ आहेत.
अपघाताची घटना दिनांक १२/०४/२०२६ असून पहाटे ०३.०० ते ०५.१४ वाजताच्या दरम्यान अपघात झाला असल्याचे दिसून आले.गुन्हा दाखल दिनांक १२/०४/२०२६ असून,सदर गुन्हा सकाळी ०८.१५ वाजता दाखल करण्यात आले.
हकीगत यापमाणे आहे की,यातील फिर्यादी यांची दिनांक ११/०४/२०२६ चे २०.०० वा ते दिनांक १२/०४/२०२६ चे ८.०० वा. पावेतो डायल ११२ डयुटी सुरु असतांना दिनांक १२/०४/२०२६ चे ५.१४ वा. डायल ११२ वर कॉल आला की,भिसी येथील शंकरपूर रोड वरील ग्राउंड जवळ अपघात होवुन एक इसम मृत अवस्थेत पडुन आहे.
अशा कॉलच्या माहिती वरुन फिर्यादी,डिओ पोहवा /६८८ अजय बगडे पो.स्टे भिसी सदर ठिकाणी गेले असता एक अनोळखी इसम अंदाजे वय ४० वर्षे यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचे डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृतावस्थेत पडून असल्याचे दिसुन आले.
मृतक अनोळखी इसमाबाबत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारपुस केली असता त्याची ओळख पटुन आली नाही.कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन अनोळखी इसमास ठोस मारुन गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत ठरला अशा फिर्याद वरुन सदरचा गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्यातील अनोळखी मृतकांची ओळख अद्याप पटनेली नसुन मृतकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.
वर्णन :- लिंग- पुरुष,वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे,वर्ण- गहुवर्ण,उंची ५.४ फुट,बांधा सळपातळ आहे.तद्वतच १) डोक्यावरील केस काळे वाढलेले,२) दाढी मिशी काळी पांढरी,३) डाव्या कानात चांदीची बारी,वस्त्र,४) अंगात पिवळसर रंगाचा फुल हाताचा शर्ट ज्यावर निळया लायनिंग व चेक्स असलेला शर्ट,५) पायात निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट,६) कमरेला चामळी बेल्ट लावलेला,७) निळसर बनियन,८) काळ्या रंगाची अंडरपॅन्ट,९) उजव्या हाताचे अंगठ्याला तळबाजुस गाळ्या रंगाची मोच,१०) उजव्या हातात काळ्या रंगाचा दोन रबर बॅन्ड एकावर महाकाल लिहीलेले,११) उजव्या हातावर नाग आणि त्रिशुल गोंदलेले आहे.
वरील वर्णनाचा इसम कुठल्याही पो.स्टे. हृददीत बेपत्ता असल्याची नोंद असल्यास अथवा मृतकाचे नातेवाईक आपले हदित मिळुन आल्यास पो.स्टे.भिसी जिल्हा चंद्रपुर येथे संपर्क साधावा,अशी विनंती नागरिकांना,पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
माहिती देण्याचे संपर्क क्रमांक पदासह खाली दिलेले आहेत....
१) सपोनि. मंगेश भोंगाडे,ठाणेदार पो.स्टे भिसी,७५८८४४१४९३....
२) पोउपनि.रविंद्र वाघ,पो.स्टे भिसी,९९७५८१८४०१...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!