बनावट देशी मद्य वाहतूक करताना कारवाई.. स्कॉर्पिओ वाहनासह १२.१९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात...

बनावट देशी मद्य वाहतूक करताना कारवाई..

 स्कॉर्पिओ वाहनासह १२.१९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात...


वरोरा...जगदीश पेंदाम

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत बोर्डा चौक परिसरात अवैधरित्या बनावट देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर सापळा रचून कारवाई करत  अंदाजे १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई महाराष्ट्र स्टेट  एक्साईज  डिपार्टमेंट च्या वरोरा पथकाने केली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास बोर्डा ते राधा मिलन मंगलकार्यालय रोडवरून बनावट देशी मद्याचा साठा घेऊन एक वाहन येणार असल्याची सूत्राकडून गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून तपासणी करण्यात आली असता तपासणी दरम्यान एमएच-३४-सीडी-३३३६ क्रमांकाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार थांबवून तपासली असता वाहनात रॉकेट देशी दारू संत्रा कंपनी या नावाचे १०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स (एकूण सुमारे ५००० बाटल्या) असा बनावट देशी मद्यसाठा आढळून आला.
या प्रकरणात आशीष रमेश मीटपल्लीवार (वय २३, रा. बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा व  स्कॉर्पिओ वाहन असे  एकूण अंदाजे १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ तसेच संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील तसेच अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पथकाने ही कारवाई केली.
कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दिडसे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे तसेच जवान विलास महाकुलकर (वाहन चालक) यांच्यासह जवान जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुयटे, अमोल भोयर, किशोर पेदुजवार आणि शुभम गोवरदीपे यांनी सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!