डॉ. संजय घाटे यांची अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड
डॉ. संजय घाटे यांची अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड
चंद्रपूर: सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे चंद्रपूर येथील डॉ. संजय मा. घाटे यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या 'नागपूर विभागीय अध्यक्ष' पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचा विस्तार आणि सामाजिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घाटे यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेता, त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
डॉ. संजय घाटे यांची या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यामुळे चंद्रपूरसह संपूर्ण नागपूर विभागात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
"डॉ. संजय घाटे यांच्या नेतृत्वात नागपूर विभागात समता परिषदेचे कार्य अधिक जोमाने वाढेल आणि वंचितांच्या प्रश्नांना न्याय मिळेल," असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या नवीन वाटचालीसाठी आणि भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!