शेगाव बु परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून भारत गॅस एलपीजी सिलेंडरचा तुटवडा... गॅस एजन्सी मध्ये गँस साठा परंतु ग्रामीण भागातील ग्राहकांच्या घरात खुळखुळा....
शेगाव बु परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून भारत गॅस एलपीजी सिलेंडरचा तुटवडा...
गॅस एजन्सी मध्ये गँस साठा परंतु ग्रामीण भागातील ग्राहकांच्या घरात खुळखुळा....
वरोरा.... जगदीश पेंदाम
तालुक्यातील शेगाव बु. येथे भारत गॅसची एजन्सी नसल्यामुळे शेगाव तसेच ग्रामीण परिसरात एक हजार च्या वर भारत गॅसची ग्राहक असून परिसरातील नागरिकांना मागील आठ ते दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
शेगाव मध्ये भारत गॅस एजन्सी नसून गॅस वितरण पॉईंट देण्यात आलेले आहे परंतु नियमाप्रमाणे जेवढे गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक होतील तेवढेच गॅस पॉईंट वितरक यांना मिळतात गॅस एजन्सी प्रमाणे ते साठवणूक करू शकत नाही, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील भारत गॅस च्या ग्राहकांना मागील १० दिवसापासून गॅस हंडा मिळत नसल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत गॅस एजन्सीला विचारणा केली असता गॅस एजन्सी मध्ये मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असून ग्रामीण भागातील बहुतांश 70 ते 80 टक्के ग्राहकांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे ऑनलाइन बुकिंग होऊ शकत नसल्यामुळे आम्ही गॅस हंडा वितरण करू शकत नाही अशी माहिती खांबाडा येथील व चंद्रपूर येथील गॅस एजन्सी यांनी दिलेली आहे..
या बाबत बी. एल. सी. पॉईंट धारक यांना विचारणा केली असता आम्हाला अधिकृतपणे सहा सिलेंडर साठवणूक करण्याची परवानगी असताना व माझ्याकडे कस्टमरची ऑनलाईन बुकिंग असताना गॅस एजन्सी कडूनच वेळेवर सिलेंडर न मिळाल्यामुळे ग्राहकांना सिलेंडर देऊ शकत नसल्याचे सांगितले...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!