सात बहिणी डोंगरावर मधमाशांच्या हल्यात पाच पर्यटक जखमी
सात बहिणी डोंगरावर मधमाशांच्या हल्यात पाच पर्यटक जखमी
तळोधी बा.:-
तळोधी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगर पेरजागड येथे आज दुपारच्या दरम्यान मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल पाच पर्यटक जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार तळोधी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगरावर चिमूर तालुक्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शंकर चाचरकर वय ५५वर्ष, नथ्थू चाचरकर ६२ वर्ष, सुनिता चाचरकर वय ५२ वर्ष, लहान मुलगी चाचरकर वय ३ वर्ष सर्व राहणार शंकरपूर येथील असुन आज सात बहिणी डोंगरावर लहान मुलाचा नवस खेळण्याकरिता आलेले होते.
मात्र दुपारला दोन वाजता अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सैरावैरा पळू लागले. मात्र दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित पेहचणे कठिण होत होते. परिनामी मधमाश्यांच्या हल्यात जखमी झाले. घटनेची माहिती वनविभागाचे कर्मचारी व स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पेहचले. व जखमीना उपचारार्थ गोविदपूर व तळोधी येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी वन विभागाचे वन रक्षक सारंगगड बिटावरचे नन्नावरे व गोविंदपुर बीटाचे वनरक्षक कागणे यांच्यासोबतच स्वाब संस्थेचा बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, स्वाब चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जीवन गुरनुले, अमिर करकाडे गणेश गावतुरे, सुरज नेवारे, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणून चार जखमी रुग्णांना गोविंदपूर येथे मदनकर डॉक्टर यांच्या दवाखान्यात तर एक गंभीर जखमी रुग्णाला बेवशीच्या हालत मध्ये तळोदी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. मात्र तरीही येथे पर्यटकांची वर्दळ असते. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!