चोराच्या उलट्या बोंबा - भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित केल्याने मानहाणीची धमकी कोंडेखल ग्रामपंचायत सचिव धीरधम्मा रायपुरे यांचा थयथयाट

 


सावली (विजय कोरेवार) -

 कोंडेखल ग्रामपंचायतीमध्ये काम न करताच लाखोचा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचारात ग्रामसेवक धीरधम्मा रायपुरे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने "पब्लिक पंचनामा" पोर्टलवरून बातमी प्रकाशित करण्यात आली. मात्र ही बातमी जिव्हारी लागल्याने पोर्टल व बातमी वायरल करणाऱ्यांवर ५० लाखाचा मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकीच देत "चोर तो चोर, वरून शिरजोर" होत असल्याची प्रचिती येत आहे. रायपुरे ग्रामसेवक पूर्वीच भद्रावती पंचायत समितीमधून निलंबित असल्याने समाजात किती आदरणीय आहे याची चर्चा कट्ट्यावर सूरू आहे.

      कोंडेखल ग्रामपंचायतीत काम न करताच शासकीय निधीचे लाखो रुपये लंपास केल्याचा व ४ महिन्यापासून मासिक सभा न घेण्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समिती प्रशासनाने केलेल्या चौकशीत उघडकीस आला. त्यामुळे येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेवर अपहार केलेली रक्कम वसूल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडे केली आहे. या अहवालाचा आधार घेत नुकतीच "पब्लिक पंचनामा" पोर्टलवरून "कामे न करताच शासनाचे २६ लाख लंपास - कोंडेखल ग्रामपंचायतमधील गैरप्रकार उघड" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली. या बातमीत सत्यता असल्याने गावातील नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर बातमी वायरल केली. त्यामुळे येथील विद्यमान ग्रामसेवक धीरधम्मा रायपुरे हे मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी देत माहिती दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. भद्रावती पंचायत समितीत कार्यरत असतांना गैरव्यवहार केल्याने पूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रकरणातही गैरव्यवहार सिद्ध झाल्याने कायमची नोकरीं गमवावी लागणार आहे. कोंडेखल गैरव्यवहार संबंधित सरपंच, ग्रामसेवकांवर फौंजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ग्रामसेवक धीरधम्मा रायपुरे यांचा काम न करता लाखोचा भ्रष्टाचार

 सरपंच/सचिव यांनी कामे न करता रु. ६१३४२०/- यांची डीएससी वापरुन निधी ज्या पुरवठादारंनी किंवा बांधकामे न केलेल्या कंत्राटदारास श्री. मनोज खरवडे यांचे नांवे रु. ६१३४२०/- PFMS केलेली आहे. त्यामुळे निधीचा अपहार केल्याने महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक व्हि, पीएम २०१६ प्र.क्र.२५३/पं.रा.३ दिनांक ४ जानेवारी २०१७ नुसार कारवाईस पात्र आहेत. त्यामुळे सरपंच सौ. सरला पिंटू कोटांगले यांचेकडुन रु. ३०६७१०/- वसुल व प्रशासकीय कार्यवाहीस पात्र आहेत व सचिव श्री. धीरधम्मा रायपुरे यांचेकडून रु. ३०६७१०/- वसुलीस तथा प्रशासकीय कार्यवाहीस पात्र आहेत. श्री. धीरधम्मा रायपुरे यांनी आपले नियम कर्तव्यात कसूर केले असल्याने म.जि. प. जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) नुसार व म.जि.प. जिल्हा सेवा (शिस्त् व अपील) नियम १९६४ नुसार प्रशासकीय कार्यवाहीस पात्र आहेत.

संजिव च. देवतळे

चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी पं.स. सावली

कोंडेखल ग्रामपंचायतमधील चौकशीत सरपंच, ग्रामसेवक गैरव्यवहार केल्याचे चौकशी अहवालात निदर्शनास आले आहे. या चौकशीस आपली सहमती असल्याने मान. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे कार्यवाही करण्यास प्रस्ताव सादर केला आहे.

मुक्तेश्वर कोमलवार 

गटविकास अधिकारी पं. स. सावली 

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!