स्वाब संस्थेने सात बहिणी डोंगर केला प्लास्टिक मुक्त
(स्वाब संस्थेच्या स्वच्छता मोहीम मध्ये दोन ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटल, पिशव्या व दारूच्या बाटल्या उचलून गड केला स्वच्छ.)
तलोधी(बा.):
तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) परिसर 'स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी' डोंगराच्या शिखरा पासून पायथ्यापर्यंत जवळपास दोन ट्रॅक्टर भरुन प्लास्टिक कचरा उचलून डोंगर परिसर प्लास्टिक मुक्त केले.
विशेष म्हणजे सात बहिणी डोंगर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे हजारोंच्या संख्येने येथे पर्यटक पर्यटनाकरिता येत असतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि महाशिवरात्रीला तर लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. यावर्षी 15 व 16 फेब्रुवारी ला महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो श्रद्धाळू या मंदिर डोंगरावर जत्रेमध्ये आले होते. डोंगरावर पाणी, शितपेय बाटल्या, विकत मिळत असल्यामुळे पर्यटक तिथेच नशा पानी व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा करतात. डोंगर तळोधी वनविभागाच्या अत्यंत घनदाट जंगल व वन्य प्राण्यांचे वावर आहे त्यामुळे वन्यजीव व पर्यावरणास हानिकारक प्लास्टिकचा कचरा स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रंद्वारे वर्षातून तीनदा हा डोंगर स्वच्छ केला जातो.
पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी झटनारी 'स्वाब' संस्था गेल्या कित्येक वर्षापासून परिसरात 'प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान' राबवून प्रत्येक महिन्याला परिसरातील जंगलालगतच्या धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळी, तलाव, रस्ते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन श्रमदानातून प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, दारूच्या बाटल्या, पिशव्या, असा गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करीत असते.
दर वर्षी प्रसिद्ध पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) येथे दोन दिवसाची यात्रा ही महाशिवरात्री ला असतोच व हजारो च्या संख्येने भाविक या यात्रेला येतात, या यात्रेमध्ये जाऊन संस्थेच्या वतीने हातात फलक घेऊन दोन दिवस जत्रेमध्ये फिरून 'प्लास्टिक कचरा पर्यावरणात कुठे फेकू नये, प्लास्टिक हटाओ पर्यावरण बचाओ, अशी जत्रेमध्ये जनजागृती केली जाते. व यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र विखरलेला प्लास्टिकच्या परिसरातील प्लास्टिक कचरा बुधवार ला सकाळी 6 वाजता मोहीम हाती घेत दुपारी 1 वाजेपर्यंत गोळा करून परिसर प्लास्टिक मुक्त केले.
यावेळी या प्लास्टिक मुक्त कार्यात संस्थेचे सावरगाव,तळोधी,कन्हाळगाव, ओवाळा, सावंगी, सावरला, येथील स्वाब संस्थेचे महिला व पुरुष स्वच्छता दुत यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला, यावेळी महीला सदस्य अर्चना आंबोरकर, मंजुशा घुगुस्कर, अपुर्वा मेश्राम, प्रतिक्षा सेलोकर, सुष्मा सयाम, कविता कायरकर, यश कायरकर, जिवेश सयाम, जीवन गुरूनुले, गणेश गुरनुले,आदित्य नान्हे, सौरव मोहुर्ले, गणेश गावतुरे, सुरज नेवारे,जिगर गुरनूले, सुजल गुरनूले,यांनी सहकार्य केले.
यांनी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवली. तर यावेळी वन विभागाचे गजानन कागणे वनरक्षक गोविंदपूर ,गणेश मैंद वनरक्षक कच्चेपार
व उपक्षेत्र गोविंदपूर मधील वनमजूर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!