सावरगाव येथे गोठ्यात घुसलेल्या चितळाला जीवदान
तळोधी (बा.):
तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव तलाव परिसरातील झुडपी जंगलात हरणांचा कळप सतत फिरत असतो. मात्र कुणीतरी त्या परिसरात वनवा लावल्याने सैरावलेल्या झालेले चितळांचा कळप इकडे तिकडे पळाले त्यातील एक नर चितळ सावरगावात घुसला व नंतर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे तो वसंता बोरकर यांच्या गोठ्यात घुसला.
या संदर्भात गावातील अनिल बोरकर यांनी माहिती स्वाब संस्थेला दिली त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती देत स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, वन विभागाचे मागोवा पथकाचे महेश बोरकर, यांनी घटनास्थळ गाठून लोकांनी पकडून ठेवलेल्या त्या नर चितळाला सुरक्षित पकडून गावातीलच तलाव परिसरातील नेले व तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने व तळोदी बीटाचे वनरक्षक राजेंद्र भरणे तथा वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत वैद्यकीय तपासणी करून त्याला कक्ष क्रमांक ५४१ मध्ये जंगलात सोडून जिवदान दिले.
कोट:
"तेंदू पत्ता आणि महफूल गोळा करण्याकरता परिसरातील जंगलामध्ये लोक बनवा लावतात, किंवा शेताचे धुरे जाळण्याकरता जंगलालगत चे शेतकरी आग लावून घरी निघून येतात त्यामुळे जंगलात वनवा लागतो. त्यामध्ये सरपटणारे प्राणी मारले जातात तर मोठे प्राणी जीव वाचवण्याकरता गाव आणि शेतीच्या दिशेने निघून जातात. त्यांचा पाठलाग करत वाघ ,बिबट सारखे प्राणी गावात येतात आणि मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. तर लोकांनी अशा प्रकारे जंगलात वनवे लावू नये कारण वनव्यामुळे बिबट गावात आल्याने आपल्याच मुलाबाळांचे जीव धोक्यात येतात." - यश कायरकर, वन्यजीव अभ्यासक, अध्यक्ष स्वाब संस्था.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!