भाजपा जनसंपर्क कार्यालय,नागपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये शेकडो च्या संख्येने पक्ष प्रवेश

चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दिनांक.०९/०३/२०२६ ला भाजपा जनसंपर्क कार्यालय, नागपूर येथे माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या प्रमुख हस्ते व चिमुर येथील माजी आमदार तथा खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाशजी वारजूकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरिषजी शर्मा , शंकरपूरचे सरपंच साईश सतीश वारजूकर तसेच पलाश अविनाश वारजूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमुर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते धनराज मालके, विजय डाबरे, केशव वरखडे, विनोद ढाकूनकर, रेहमान खा पठाण, अरुण पिसे, गोपाल झाडे, उमेश हिंगे, ज्ञानेश्वर राऊत, आमोद गौरकर, संजय बावनकर, रुपचंद शास्त्रकार,दिपक कुंभारे, पप्पू शेख,लोकेश रामटेके, ग्याणी अंधरले, आकाश पाटील, उमेश बोमेवार, रुपचंद बरसागडे, प्रमोद दाभेकर, सौ. सुरेखा शेम्भेकर, प्रवीण वरगंटीवार, आकांक्षा वरगंटीवार, गीतांजली योगेश थुटे, प्रिती दीडमुठे, नम्रता रामटेके,या सोबतच असंख्य कार्यकर्ता यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, जल - जहाजरनी रस्ते विकास महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी ,महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सक्षम नेतृत्वावर तथा चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या लोकाभिमुख व विकासाभिमुख कार्यशैलीत प्रेरीत होऊन त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी हा निर्णय घेतला असून माजी आमदार मितेशजी भांगडीया यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मान्यवराचे भाजप परिवारातर्फे मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.व यांच्या प्रवेशामुळे चिमुर विधानसभा क्षेत्राला पुन्हा बळकट करण्यासाठी विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवणारे अनुभवी नेतृत्व जेव्हा एकत्र येते, तेव्हा संघटन अधिक बळकट होते आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ होतो. भाजप परिवारात नव्या जोमाने सामील झालेल्या या नेतृत्वामुळे चिमुर विधानसभा क्षेत्राचे संघटनात्मक बळ निश्चितच वृद्धिंगत होईल हा विश्वास उपस्थितानी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रामुख्याने चिमूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकगण यांच्या समेत आदी मान्यवराची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!