श्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा) वतीने नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल आराध्य अजय बारस्कर यांचे सत्कार .




तळोधी बा . :- तळोधी येथील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते  श्री अजय सदशिवराव बारस्कर यांचे चिरंजीव *आराध्य अजय बारस्कर* यांची नवोदय विद्यालय तळोधी येथे निवड झाली. त्याबद्दल तळोधी परिसरात आराध्य चे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 
आराध्य हा खूप मेहनती व जिद्दी ने अभ्यास करणारा मुलगा आहे व अभ्यासाबरोबर भाषणकलाही अवगत आहे.आराध्य प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधून व त्यानंतर महात्मा फुले विद्यालय सुरू आहे अगदी सामान्य परिवारात वावरून सुद्धा नवोदय मध्ये लागायचं आहे या ध्येयाने सतत अभ्यास करून सातत्य ठेवून त्याने यश संपादन केले आहे व त्याची निवड नवोदय विद्यालय तळोधी येथे झाली आहे.
याचे औचित्य साधून श्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा)यांच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिकृती व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .याप्रसंगी 
श्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा) चे अध्यक्ष श्री सौरभ गिरडकर
 मुख्यमार्गदर्शक भुपेश भाकर सर, मुख्यमार्गदर्शक प्रा. सचिन वाढई सर,
 श्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा.) चे सचिव- प्रमोद बावनथडे
 सदस्य- 
लोकेश कावळे ,नितिन मांढरे, पंजाब निपाने, नितीन भेंडाळे, गौरव मदनकर , गणेश गुरुनुले व वैभव बारसागडे व ईतर सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!