मुलं चोरणाऱ्या टोळीच्या सत्य आणि लोकांची भूमिका.
यश कायरकर:
सध्या संपूर्ण जिल्हाभरच नाहीतर महाराष्ट्रभर किंवा देशभर मुले चोरणारी टोळीची सक्रियता असल्याचे दिसून येत आहे .मात्र याबाबतचे व्हिडिओ आणि मेसेजेस सोशल मीडियावर सतत वायरल होत असतात आणि त्यामुळे परिसरात कोणतेही अनोळखी व्यक्ती किंवा टोडी कपडे विक्रेते किंवा इतर बाहेरून येणारे व्यवसायिक भटके व्यवसायिक यांच्याकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असून ते सर्व लोक याच संदिग्ध टोळीचाच भाग असल्याचे चित्र लोकांच्या डोळ्यासमोर दिसून लागले.
याच संदर्भात काल सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव (जाट) येथे एका मनोरुग्ण बाईला पकडून ती मुले चोरणाऱ्या टोळीचाच सदस्य असून बाकी दोन सदस्य फरार झाल्याची माहिती पोलिसांना आणि समाज माध्यमावर पसरवण्यात आली. मात्र संपूर्ण चौकशी केल्या असता पोलिसांना ती मनोरुग्नच महिला असल्याचे निदर्शनास आले. या पूर्वी याच परिसरातील आलेवाही गावात तलावा शेजारी एक युवक आढळून आला. तो सुद्धा तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याने त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याबद्दलही सोशल मीडिया आणि पोलिसांना तो मुलं चोरणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची सूचना पुरविण्यात आली. त्याचीही चौकशी केली असता घुगुस जवळील तो ही ईसम मनो रुग्ण असल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक तळोधी येथे कपडे विकायला आलेल्या युवकांनी महिलेला चाकू दाखवण्याचा पसारामांडून त्यांना चोप देऊन तळोधी पोलीस स्टेशन येथे यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र त्याचीही सखोल चौकशी केली असता ते व्यापारी कपडे विकायलाच आले असल्याचे निदर्शनास आले. बाहेरून व्यापार करायला आलेले किंवा मनोरुग्ण परिसरामध्ये भटकताना ते कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशन किंवा पोलीस पाटील यांच्याकडे रितसर नोंद करत नाही त्यामुळे जर त्यांना जमावाने घेरले तर ते योग्य ते उत्तरे लोकांना देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावतो आणि त्यांना मारहाण केल्याच्या घटना घडतात. यावेळी जनतेने संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे.
या घटनांवरून सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या मानसिकतेवर ज्या पद्धतीने पडला आहे त्यामुळे कोणतेही सखोल चौकशी न करता संशयितांना मारहाण करणे किंवा सोशल मीडियावर ते मुले चोरणाऱ्या टोळीच्या हिस्सा असल्याचे पसरवणे हे चुकीचे ठरत आहे. कारण मागिल वर्षी मनिडोरले विकनार्या दोन महिलांचा मुलं चोरणाऱ्या असल्याच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झाल्याची घटनाही आपल्या देशात घडलेली आहे. त्यामुळे या घटनांमध्ये संयम ठेवून चौकशी करणे गरजेचे आहे.
मात्र या घटनांमधून समाजासमोर दिसून येत आहे की आत्ताची युवा पिढी ही सजग, चौकस, आणि सावधान असल्याचे निदर्शनास येत आहे. *परिसरात बाहेरून येणाऱ्या दरोडे घालणाऱ्या, शिकार करणाऱ्या, किंवा मुले चोरणाऱ्या टोळींना आता परिसरात वाव नाही परिसरातील लोक जागृत झालेले आहेत हे या घटनांवरून निदर्शनास येते.* असो युवकांच्या जागृतपणा बद्दल त्यांचे स्तुती करणे गरजेचे आहे.
"कोणत्याही अशा संशयास्पद हालचाली असलेल्या व्यक्ती दिसल्या की अप्रिय घटना घडण्याआधी त्यांची चौकशी करणे योग्यच आहे. मात्र आधी संपूर्ण चौकशी करूनच नंतरचे पाऊल उचलावे, आणि या संदर्भात सर्वप्रथम पोलिसांनाच कळवावे." असे तळोधी बा. व सिंदेवाही पोलिसांनी परिसरातील जनतेला सूचित केलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!