पीएमश्री हायस्कूल पाथरी येथे वन दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम
सिंदेवाही:
पीएमश्री जि.प. हायस्कुल पाथरी येथे वन दिनानिमित्त चे अवचित्य साधुन 'निसर्गचक्र पर्यावरण आग, साप ,वाघ' या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावर वेळी परिसरातील सापाच्या विविध प्रजाती, सापांच्या अंधश्रद्धा, या विषयावर मार्गदर्शन करताना जिवेश सयाम यांनी "सापाबद्दलची भीतीही अज्ञानातून आली आहे त्यामुळे ते दूर करण्याकरता सापांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे, परिसरात फक्त चारच विषारी साप असून बाकी संपूर्ण बिनविषारी साप आहेत त्यामुळे सर्प दंश झाल्यावर घाबरून जाता कामा नये, कोणताही साप चावला तर आधी शासकीय रुग्णालयातच जा व बुवा बाबाच्या नादी लागू नका, अंधश्रद्धेमुळे मानवाचा बळी जातो असे यावेळेस बोलताना स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेस सयाम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यश कायरकर यांनी पर्यावरण निसर्गचक्र व त्यातील साप , वाघ, यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी वाघांबद्दल माहिती देत मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याचे कारणे सांगत, "निसर्गचक्रात वाघ असो चिमणी, की साप असो की मधमाशी, सर्वांचे महत्त्वाचे स्थान असून कोणतेही प्राणी एकमेकांशी निगडित असून. मानवा इतकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भविष्य टिकवण्याकरता आपल्याला पर्यावरणात जंगल आणि वन्यजीव टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जंगलाला आग लावण्याचे टाळा" असे सांगत वाघाच्या जंगलातील अस्तित्वाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक पांडुरंग एस. श्रीरामे, हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेस सयाम तथा अध्यक्ष यश कायरकर यांनी पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे म्हणून आर.आर.सिडाम क्षेत्र सहाय्यक नवरगाव, स्वाब संस्थेचे सर्पमित्र जीवन गुरनुले, गणेश गुरनुले, आदित्य नाण्हे, गणेश गावतुरे, सुरज नेवारे, रवी मारभते हे होते. प्रफुल टेकाम सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विनोद बागडे सर, यांनी या कार्यक्रमात चे आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक प्रकाश वाढई सर, वारुडकर सर, प्रफुल टेकाम सर दिनेश धारणे सर भसारकर मॅडम, पेंदाम मॅडम मोनिका कोरेवार मॅडम, तथा शाळेतील इको क्लबचे विद्यार्थी, संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!