गॅस नाही, तरीही उकळतोय चहा… रहस्य काय आहे या दुकानामागे?

गॅस टंचाईत ‘चहाची किमया’ – विजेच्या आधुनिक चुलीवर पेटला व्यवसाय! ☕


मूल शहरात सध्या गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लहान-मोठ्या व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पर्याय म्हणून काहींनी पारंपरिक चुलीचा आधार घेतला असला, तरी लाकूड पेटवणे, ज्वाला कायम ठेवणे आणि धुरामुळे होणारा त्रास यामुळे हा मार्गही अत्यंत कष्टदायक ठरत आहे.
मात्र, “गरज ही शोधाची जननी आहे” असे म्हणतात आणि याचाच प्रत्यय आता या आधुनिक चुलीच्या निमित्ताने येत आहे. संकटातही काहींनी शक्कल लढवत नव्या मार्गाचा अवलंब केला आहे. विजेवर चालणाऱ्या आधुनिक चुलींचा वापर करून त्यांनी आपला व्यवसाय सुरळीत सुरू ठेवला आहे.
मूल बस स्थानकासमोर असलेले मंगेश खोब्रागडे यांचे प्रसिद्ध चहाचे दुकान याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. गॅस नसतानाही त्यांनी आधुनिक विजेच्या चुलीचा वापर करून ग्राहकांची चहाची तलफ भागवण्याचा मार्ग शोधला आहे.
या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांनाही वेळेवर चहा मिळत असून, व्यवसायही सुरळीत सुरू आहे. संकटात संधी शोधत मंगेश खोब्रागडे यांनी दाखवलेली ही कल्पकता इतर व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गॅस टंचाईच्या काळातही ‘चहाचा सुगंध’ कायम ठेवणाऱ्या या नवकल्पनेची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!