सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल

मोहाफुले साठी आग लावणे पडले महागात 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - 30/03/2026 सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिरसी मधील कक्ष क्रमांक 1534 (संरक्षित वन) मध्ये मोहा फुले वेचण्याच्या निमित्ताने आग लावणाऱ्या मौजा लोंढोली येथील 1. सौ वनमाला मोरेश्वर घोंगडे व 39 वर्ष, 2. उमेश नरेंद्र घोंगडे वय 25 वर्ष, 3. भूपेंद्र नीलकंठ खोबे वय 25 वर्ष या तिघांविरुद्ध वनविभागाने वन गुन्हा दाखल केला. वने ही राष्ट्रीय संपत्ती असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. वने आहे तर जीवन आहे. वने संपुष्टात आले तर पृथ्वीवरील संपूर्ण अन्नसाखळी बिघडेल व पर्यावरणाचा समतोल ढासळेल आणि पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल, पर्यायाने नामशेष होईल. ऑक्सिजन,पाणी, अन्न व वस्त्र ह्या मानवाच्या मूलभूत गरजा मिळणे अशक्य होईल. वनाचे इतके सारे महत्त्व असतानाही, शासन स्तरावर विविध उपक्रमाचे माध्यमातून जनजागृती केली जात असतानाही कृत्रिम वनवा लावणे नित्याचीच बाब झाली आहे. दिनांक. 28 3/2026 रोजी वनरक्षक शिरसी हे आपल्या पीआरटी समूह जंगलगस्त करीत असताना वरील तीनही आरोपी जंगलात आग लावून पळून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. कार्यवाही शिवाय या अमानुष प्रवृत्तीला आळा बसणे शक्य नाही म्हणून वरील तीनही आरोपीविरुद्ध वन गुन्हा क्रमांक 204/232854/2026 दिनांक 28 3/2026 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 (ड) नुसार 2 वर्षापर्यंत कैद व आगीत सजीव सृष्टीची फार मोठी हानी झाल्यामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 व 39 अन्वये 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
सदर प्रकरणी राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात मारुती पुल्लेवाड क्षेत्र सहाय्यक व्याहाड पुढील तपास करीत आहे. सदर प्रकरणाचे चौकशी दरम्यान महादेव मुंडे वनरक्षक सिरसी, एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी, श्री डांगे वनरक्षक उपरी, सुषमा मेश्राम वनरक्षक नवेगाव तसेच पीआरटी चमू व बीट मदतनीस शिरशी यांनी मुलाचे सहकार्य केलेत. आग लावणाऱ्याचे नाव सांगितल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना रोख 10,000 नगदी स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. वनाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतावरील पाळे- धुरे जाळताना मोहाचे झाडाखाली जाळताना जंगलाला आग लागणार नाही, याची दक्षता घेऊन नागरिकांनी पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!