शेगाव गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

विकासापासून अनेक वर्षापासून वंचित

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव हे तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून या गावात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेला महत्त्व दिले जाते तरीसुद्धा वर्षानुवर्षे हे गाव विकासापासून दूर असून आजही वंचित राहिलेले आहे.या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून बाजारपेठेला 50 ते 60 गावे जोडलेली आहे तसेच इंग्रज काळापासून पोलीस स्टेशन असून या पोलीस स्टेशनला 102 गावे जोडलेली आहे, आजही परिसरातील कारभार तिथूनच सुरू आहे या गावात दोन शाळा, प्राथमिक आरोग्य वैद्यकीय दवाखाना, पशु दवाखाना, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, कपास जिनिंग, बाजार समिती, देशी,विदेशी दारू दुकान,बँक असून मोठी बाजार मार्केट लाईन या ठिकाणी आहे, 
आजही मागील अनेक वर्षापासून नागरिकांना या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वाहतूक करताना महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ न नागरिकांना त्रास सहन करावा लागते तसेच या ठिकाणावरून चिमुर,वरोरा 353 ई राज्य मार्ग  असून अरुंद रस्त्या अभावी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते, रस्त्याच्या मध्ये भागात डिव्हायडर असून मोठ्या प्रमाणात ठीक ठिकाणी डिव्हायडरवर कचरा साचलेल्या दिसून येत आहेत, तसेच या ठिकाणी कोणत्याच प्रकारे अजून पर्यंत स्टिट लाईटची व्यवस्था केली नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक व्यवस्था स्टिट लाईट अभावी वंचित राहिलेले आहे, तसेच गावातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठिक ठिकाणी अतिक्रमण वाढली असून परिसरातील नागरिकांना जाणे येण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होते तसेच व्यापारी लाईन सुद्धा या ठिकाणी वाहन उभे करताना त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी गावातील नागरिकांनी वारंवार नगरपंचायतची निर्मिती व्हावी म्हणून शासन दरबारी मागणी केली असून याकडे अजून पर्यंत दुर्लक्ष करण्यात आलेले आहे शेगाव गावात 13 सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत असून गावात वाढती लोकसंख्या, व्यापारी उलाढाल लक्षात घेता स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन अनेक प्रश्न आजही नागरिकांना नगरपंचायत अभावी भेडसावत आहे,तसेच या गावात असलेले पोलीस स्टेशन हे सन 1938 इंग्रज काळापासून असून 87 वर्ष होऊन सुद्धा नवीन इमारत झालेले नसल्यामुळे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा अनेक सुविधा पासून आजही वंचित राहावे लागत आहे,शेगाव मध्ये विकासासाठी प्रशासन,लोकप्रतिनिधी स्फूर्ती कधी दाखवणार हे येणाऱ्या काळातकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!