कच्चेपार सफारी चा सचिन तेंडुलकर नी घेतला आनंद.

कच्चेपार सफारी चा सचिन तेंडुलकर नी घेतला आनंद.
यश कायरकर:
सिंधुबाई वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी डिव्हिजन मधील कच्चेपार सफारी गेटमधून 
क्रिकेटचा दिग्गज यांनी सफारीचा आनंद घेतला.
      विशेष म्हणजे नव्याने सुरू झालेल्या कचेपार–संपारी गेटची या परिसरामध्ये कधि काळी बिट्टू सारख्या जगप्रसिद्ध वाघाचे वास्तव्य असल्याने सचिन तेंदुलकर साठी हा आकर्षणाचा गेट होताच. हा गेट सुरू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी ताडोबा वरून सिंदेवाही येथे आज  या गेटला खास भेट दिली.
यानंतर त्यांनी या गेटमधून जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले आणि वनरक्षक ऋषिकेश जावळे यांनी त्यांना मार्गदर्शन करत सफारी दर्शन घडविले.
जरी या सफारीदरम्यान वाघाचे दर्शन झाले नाही, तरी ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणाचा सचिन यांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी वनविभाग ब्रम्हपुरी चे उपवन संरक्षक कुमार स्वामी, सहायक वन संरक्षक प्रशिक्षणार्थी सहायक वनसंरक्षक अरविंद जे, बायोलॉजिस्ट राकेाश आहुजा, कच्चेपार सफारी गेटवर त्यांची भेट घेतली.
दिग्गजांच्या अशा भेटींमुळे सिंदेवाहीतील कचेपार–संपारी गेट हे पर्यटनासाठी नव्याने आकर्षण ठरत असून, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आणखी बळकट होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!