महिला दिनानिमित्त प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
महिला दिनानिमित्त प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
दि. 21 मार्च 2026 रोजी गावात महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त असा उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “कालची स्त्री, आजची स्त्री आणि उद्याची स्त्री” या विषयावर मार्गदर्शन करत स्त्रीवरील अन्याय व अत्याचार याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संध्याताई गुरनुले (माजी अध्यक्षा, जि.प. चंद्रपूर) होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन चंदू मारगोनवार (माजी सभापती, पं.स. मूल) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संजय येनूरकर (माजी सरपंच, गाडीसुर्ला) उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गुरनुले (सरपंच, ग्रा. पं. फिस्कुटी), प्रमुख मार्गदर्शक किशोर शेंडे (शिक्षक), तसेच संगीता वाडगुरे (अध्यक्षा, समता ग्राम संघ), सखीला चौधरी (सचिव), सोनू शेंडे (उपाध्यक्ष, समता ग्राम संघ) यांचीही उपस्थिती लाभली. गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, समता ग्राम संघाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुणाली जेंगठे यांनी केले, तर प्रास्ताविक इंद्रायणी जेंगठे यांनी सादर केले. आभार प्रदर्शन नीता चौधरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका व आकर्षक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांचे मन जिंकले. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!