पुरोगामी शिक्षक संघटना द्वारा नारी शक्तीचा सन्मान व विविध कलाविष्कार उत्साहात संपन्न
महाराष्ट्र पुरोगामी महिला मंच जिल्हा चंद्रपूर द्वारा आरोग्य मार्गदर्शन, सांस्कृतिक स्पर्धा, सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते.डा.नसरीन मावानी स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी कर्करोगापासुन बचाव यांवर उत्तम मार्गदर्शन केले व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या विविध समस्या व लवकर आढावा सभा घेण्यात येईल असे सुतोवाच केले... नारी शक्ती चा सन्मान व संवाद यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन केल्याचे विद्या खटी यांनी सांगितले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::;;;
खास महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूर तथा पुरोगामी महिला मंच जिल्हा चंद्रपूर द्वारा २१ मार्च २०२६ ला मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे महिला मेळावा तथा विविध कलाविष्कार कार्यक्रम संपन्न झाला..
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे शुभहस्ते व पुरोगामी महिला मंच राज्याध्यक्ष डॉ.अल्का ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ.नसरीन मावानी स्त्रीरोग तज्ज्ञ,विजय भोगेकर राज्य नेते, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस,चंदा खांडरे राज्य सल्लागार, नारायण कांबळे जिल्हा नेते, सुनिता इटनकर जिल्हा नेत्या, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष, सुरेश गिलोरकर जिल्हा सरचिटणीस, सुनिल कोहपरे जिल्हा कोषाध्यक्ष, व गंगाधर बोढे जिल्हा कार्याध्यक्ष, विद्या खटी जिल्हाध्यक्ष, महिला मंच, पौर्णिमा मेहरकुरे जिल्हा सरचिटणीस महिला मंच, लता मडावी जिल्हा कोषाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
"शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता त्यांना फक्त शिक्षणाचे पवित्र कार्य करु द्यावे पण तसं होताना दिसत नाही. शासनाने अनेक अशैक्षणिक कामांचा ससेमिरा शिक्षकांकडे लावलेला आहे. बीएलओ सारखी कामे न केल्यास चूकीचे पद्धतीने एफ आय आर दाखल केले जात आहे.. हे बंद होणे आवश्यक आहे असे शिक्षक आमदार यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले". महिला मेळाव्याचे आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकात व्यक्त करताना म्हटले की "महिलांमध्ये संवाद होणे, स्त्रियांमधील विविध कलाविष्कारांची उधळण होणे, व शैक्षणिक व कौटुंबिक विचार विमर्श होण्यासाठी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नारींचा सत्कार करुन प्रेरणा मिळण्यासाठी महिला मेळावा घेतला जातो अशा भावना व्यक्त केल्या".
महिला मेळाव्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूर चे सर्व तालुकास्तरीय पुरोगामी महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये आरोग्य मार्गदर्शन कर्करोगापासुन बचाव, सांस्कृतिक स्पर्धा व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नारींचा सत्कार करण्यात आला... याप्रसंगी राज्य नेते विजय भोगेकर, अल्का ठाकरे राज्याध्यक्ष पुरोगामी महिला मंच, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांनी महिला मेळाव्याला यथोचित मार्गदर्शन केले.समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पुरोगामी महिला मंच बल्लारपूर, द्वितीय क्रमांक पुरोगामी महिला मंच चिमुर व तृतीय क्रमांक पुरोगामी महिला मंच सावली तसेच समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पुरोगामी महिला मंच चिमुर, द्वितीय क्रमांक पुरोगामी महिला मंच पोंभुर्णा व तृतीय क्रमांक पुरोगामी महिला मंच सावली यांनी पटकाविला.विजेत्या चमुंना गौरविण्यात आले... कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुबक पुरोगामी महिला मेळावा दर्शविणारी रा़गोळी आणि प्रेरणागीत यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरोगामी महिला मंच जिल्हाध्यक्षा विद्या खटी यांनी केले.आभार जिल्हा सरचिटणीस महिला मंच पौर्णिमा मेहरकुरे यांनी मानले.दुस- या टप्याचे संचलन ज्योती गावंडे व मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती लखमापुरे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!