कोसरसार ते बोडखा (मो) येथील चालू असलेले रोडचे निकृष्ठ दर्जाचे काम नागरिकांनी पाडले बंद

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - जिल्हा परिषद  उप बांधकाम विभाग वरोरा अंतर्गत कोसरसार ते बोडखा मोकाशी येथील 1.5 किलोमीटर डांबिरीकरण रस्त्याचे बांधकाम मागील दोन दिवसापासून सुरु असून हे बांधकाम निष्कृत दर्जाचे सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांनी बंद पाडलेले आहे.या डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम जय गिरनारी कन्ट्रक्शन वरोरा या कन्ट्रक्शन कंपनीला मिळाले असुन सदर कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून येताच रोड चे काम तात्काळ बंद पाडले असून   यावेळी याची माहिती बोडखा, कोसरसार येथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली व जो पर्यंत कामाचा दर्जा चांगला मिळणार नाही तो पर्यंत आम्ही रस्त्याचे काम होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून या रस्त्याचा उपयोग गरोदर,महिला,जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी,शेतकरी नेहमीच करीत असतात, या रस्त्याला आम्हाला चांगले रस्त्याची ५,१० वर्ष वाट पहावी लागते तसेच पावसाळ्यामध्ये रस्ता खराब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे ही शोकांतिका आहे. त्यामुळे वाहतूक करतांना याची झळ गरोदर महिला,ज्येष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी,शेतकरी यांना सोसावी लागते रस्ताचे बांधकाम खराब झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अपघातमध्ये कोणत्या नागरिकांना जीवितहानी झाली तर त्याला जय गिरनारी कन्स्ट्रकशन कंपनी जिम्मेदार असणार व संबंधित अधिकारी सुद्धा जबाबदार असणार या रोडचे काम बंद पाडतांना स्थानिक नागरिक तुषार बलखंडे, उपसरपंच अमित बहादुरे, विनोद लोहकरे, उमेश तडस, गणेश चिडे, विशाल कुडे, प्रवीण कामडी, होमराज पेंदोर बोडखा  व कोसरसार येथील नागरिक उपस्थित होते, कामाची गुणवत्ता जर चांगले पद्धतीने दिली नाही तर काम बंद आंदोलन रस्त्यावर करू असे गावकऱ्यांनी म्हणणे आहे, गावकऱ्यांनी काम बंद पाडल्यानंतर घटनास्थळी  इंजिनिअर पिंपळशेंडे उपस्तिथ असताना त्यांना प्रतिक्रिया देण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी यावेळी टाळाटाळ केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!