दोन प्राध्यापकांवर अदखल पात्र गुन्हा

दोन प्राध्यापकांवर अदखल पात्र गुन्हा


तळोधी (बा.)  येथील एका खासगी शिक्षण संस्थेतील दोन प्राध्यापकांनी त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीला मानसिक त्रास दिल्याने त्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन प्राध्यापकावर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात न खळबळ माजली आहे. प्रा. मिलिंद शेंडे (वय ४०), प्रा. सचीन वाढई (वय ४५) अशी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या दोन प्राध्यापकांनी त्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या एका मुलीला नेहमी मानसिक त्रास देणे, त्या मुलीचा इतर
विद्याथ्यर्थ्यांसमोर अपमान करणे, तिच्या व आईच्या चारित्र्याविषयी इतर विद्यार्थ्यांना विचारणे, या गोष्टीमुळे या विद्यार्थिनीला मानसिक त्रास सहन करावा लागत असे. वा सर्व प्रकाराबद्दल तिने आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी

महाविद्यालयात येऊन दोन्ही प्राध्यापकांना मुलीला त्रास देऊ नका, असे बजावले. परंतु, या नंतरही हा प्रकार सुरूच होता. या प्रकारामुळे मुलीची तब्येत नेहमी बिघडत होती. त्यामुळे शेवटी मुलीने दोन्ही प्राध्यापकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. कलम १२६ (२) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार दोन्ही प्राध्यापकांविरूद्ध अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही प्राध्यापकांनी मुलीला एवढा त्रास दिला की ती मुलगी शिक्षण सोडणार होती. तशी माहिती तिने आपल्या वडीलाला दिली होती.

तरीसुद्धा दोन्ही प्राध्यापकांनी नाहक त्रास दिल्यामुळे पोलीस तक्रार देण्यात आली. या अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांनी कलम १२६ भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ अन्वये दोन्ही गैरअर्जदार यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून विशेष कार्यकारी अधिकारी तथा तहसीलदार, नागभीड यांच्या कोर्टात न्यायप्रविष्ठ करण्यात आली आहे. दोन्ही प्राध्यापकावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भानारकर करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!