मूल शहरात भीषण आग; नगरसेविका प्राची आक्केवार यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मूल शहरात भीषण आग; नगरसेविका प्राची आक्केवार यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मूल : शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या आरोग्य विभागाच्या जुन्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राजवळील काही फुटपाथवरील दुकानांना आज अचानक भीषण आग लागली. क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मूल नगर परिषदेच्या नगरसेविका प्राची आक्केवार यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही दुकानांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अशा घटनांपासून बचावासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!