राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला दुचाकीची जबर धडक
दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भारतात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान मोहीम परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर अजूनही नियमाची पायमल्ली करून वाहने सर्रास सुरु आहे. याचाच एक जिवंत उदाहरण चिमूर शहरात दिनांक. १८/०३/२०२६ ला सकाळी वेळ ९ ते १० वाजताच्या सुमारास नगर परिषद चिमूर तर्फे सफाई अभियान नियमित राबविणारे खाजगी कंत्राटदाराचे ट्रॅक्टर नेहमी प्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने रोड दुभाजकाला लागून उभे केल्याने हा अपघात घडला. सविस्तर नेहरू चौक येथील महामार्गावरील रोड दुभाजकाला अगदी लागुण ट्रॅक्टर मुंडा क्रमांक. MH 40 L 5509 व ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक. MH 34 BV 7365 उभी केली असतांना मागून येणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीने जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी चालकाचे घटनास्थळी मृत्यू झाले असून दुचाकी क्रमांक. MH 34 AW 8587 या दुचाकीवर मधोमध बसलेल्या इसमाचे नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या तिसऱ्या इसमावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.दुचाकी स्वारांची नाव - (1) चालक प्रथमेश मनोहर मेश्राम वय 24 वर्षे राहणार नेताजी वार्ड चिमूर, ( मृतक ), (2) प्रशांत अभिमन शंभरकर वय 39 वर्षे राहणार कवडशी ( रोडी ) चिमूर, उपचारादरम्यान मृत्यू , (3)उत्तम रंगाराव रामटेके वय 50 वर्षे राहणार कवडशी ( रोडी ) चिमूर, अती दक्षता विभागात उपचार सुरु आहे. तर ट्रॅक्टर चालक उस्मान खाँ छोटू खाँ पठाण वय 60 वर्षे राहणार नेताजी वार्ड चिमूर असे आहे.या घटनेची चिमूर शहरात सर्वत्र चर्चा रंगू लागली असून नगर परिषद चिमूर चे कंत्राटदार यांनीही नियम धाब्यावर बसवून सर्रास कृषी उपयोगी ट्रॅक्टर वाहणाने नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा उचल करणे करीता उपयोगी लावले. हे प्रकार बघता नगर परिषद चिमूर यांनी कंत्राटदार यांनी कशाप्रकारची वाहने कंत्राट पूर्ण करण्यासाठी वापरावी याबाबत ची माहिती दिली असावी परंतु निविदेतील नियमावलीचा योग्य वापर न करता सर्रास नियमाची पायमल्ली केली गेली. यात नजर चुकीने हा अपघात घडला असावा तरी चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक चिमूर , प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या घटनेची पुरेपूर चौकशी करून कंत्राटदारावर वाहन चालकावर व वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!