हवेच्या झोकेत चिमुर - जांभुळघाट रोड वरील डिव्हायडर ची पळझळ

कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ठ दर्जाचे

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमुर-जांभुळघाट रोड वर डिव्हायडर चे काम करण्यात आले होते पण काही दिवासातच एका हवेच्या झोकेत बरेश्या जागेचे डिव्हायडर पडले असल्याचे चित्र बघवयास मिळत आहे.डिव्हायडर लावण्यात आले होते पण कंत्राटदारा कडून यावर पाणी कधीही मारण्यात आले नाही.सिमेट चे काम असो कि डांबरा चे काम असो कोणतेही काम इस्टीमेट नुसार होताना दिसत नाही. दर्जेदार काम आता फार कमी होत असल्याने कंत्राटदार भष्ठाचाराच्या भोवर्‍यात नाचत आहे. कंत्राटदारावर आमदार,खासदार व मंत्र्याचा  आर्शिवाद असल्याने कंत्राटदाराचा कोणीच काही करू शकत नाही असेही चित्र दिसून येत आहे. अभियंता तर आमदार,खासदार व मंत्र्याच्या विरोधा जाऊ शकतच नाही त्याना सूद्धा आपली नौकरी वाचवायची असते.त्यामुळे काम कसेही असो टक्केवारी शी काम असते. काम ईस्टीमेट नुसार झाला की नाही काही त्यासोबत काहीच घेने - देने नसते बिल काढायला एकदम ओके म्हणून स्वासरी मारून बिल पास करीत असतात.अश्या व्यस्थेमुळ भष्ठाचाराचा रोप मोठ्या प्रमाणात रोवताना ठिक - ठिकाणी दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!