बघावे तिकडे गॅस सिलेंडर ची हाणामारी
पवनीतही गॅस सिलेंडरचा स्टॉक संपला
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - सध्या युद्ध सुरू असलेल्या इराण इजराइलच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस सिलेंडर व डिझेल चा अभाव का? भीतीचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले असून, त्याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात उमटताना दिसत आहेत. विशेषतः एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिस्थितीचा फायदा घेत काही साठेबाज व काळाबाजारी करणाऱ्या घटकांनी गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवटा निर्माण केल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. शहरातील भावना गॅस एजन्सींवर “सिलेंडर स्टॉक संपला” अशा साध्या कागदावरील सूचना लावण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी भंडारा जिल्ह्यात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोंढा व इतर ग्रामीण भागातून अनेक ग्राहक शहरात गॅस घेण्यासाठी आले होते. मात्र, एजन्सीसमोर लावलेल्या “स्टॉक संपला” या सूचनेमुळे त्यांना निराश होऊन परत जावे लागले. अनेक नागरिकांना केविलवाण्या चेहऱ्याने परतीचा मार्ग धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या सर्व प्रकारामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अफवांवर नियंत्रण ठेवावे, तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!