जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन मुली व महिलांसाठी कॅन्सर जनजागृती

जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन मुली व महिलांसाठी कॅन्सर जनजागृती कार्यक्रम


नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे आज International Women's Day निमित्त किशोरवयीन मुली व त्यांच्या महिला पालकांसाठी कॅन्सर व आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कॅन्सर हा आजार कसा होतो, तो होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, त्याची सुरुवातीची लक्षणे आणि त्याचे परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी अल्का वरगंटीवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परिणीता सोनटक्के (मेडिकल ऑफिसर, मूल) आणि डॉ. निकिता जटाळे (मेडिकल ऑफिसर, मूल) उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. सपना मारकवार, विद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान डॉ. सोनटक्के व डॉ. जटाळे यांनी विद्यार्थिनी व महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व, नियमित तपासणी, स्वच्छता, संतुलित आहार आणि कॅन्सरपासून बचावाचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थिनी व महिला पालकांनी आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थित डॉक्टरांनी त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण होऊन आरोग्याबाबत सजग राहण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ. अर्चना बेलसरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!