वरोरा महसूल च्या तलाठी पथकाने अवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर केली कारवाई

अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
वरोरा : - शेगाव बू. वरून दादापुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ८ च्या दरम्यान अवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर वरोरा तहसीलच्या महसूल पथक यांनी पकडून पंचनामा करत कारवाई केली आहे.महसूल पथक यांनी तो ट्रॅक्टर  शेगाव बु.पोलीस स्टेशन येथे जमा केला असून ही कारवाई शेगाव महसूल मंडळ अधिकारी निखाडे,तसेच तलाठी कविता क्षीरसागर,मंदा हेपड, रोहित धायवनकर, स्नेहा रोहनकर, घनश्याम गुगल, गौरीशंकर वालोदे यांनी केली अवैद्य रेती भरलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉली वर कुठेही रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला नसल्याकारणाने  संबंधित अधिकाऱ्यांना फोन द्वारे माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता काही कळु शकले नाही, महसूल अधिकाऱ्यांनी केलेली कारवाईवर इतर अवैध रेती धंदे करणाऱ्यामध्ये भिती निर्माण झाली असून अवैध मोठे धंदे करणारे मात्र यापासून सुटले जात असून परिसरात एवळ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची दिवसाढवळ्या खुलेआम चोरी होत असताना एखादी थातुर्मातूर कारवाई करून कारवाई करीत असल्याचा आव तर आणत नाही ना ? असे कित्तेक प्रश्न मात्र आता या अशा थातूरमातुर केलेल्या कारवाईमुळे निर्माण झाले आहे.तसेच महसूल विभाग खरच कारवाई करीत असेल तर मग अजूनही दिवसाढवळ्या शेगाव हद्दीत अवैध रेती,मुरुम अवैध गौण खनिज संपत्ती दिवसाढवळ्या अजूनही सुरु कसे ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात जोर धरू लागलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!