भाऊच ठरला बहिणीचा जल्लाद : कौटुंबिक वादातून तलवारीने निर्घृण हत्या



भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड परिसरात कौटुंबिक वादातून तलवारीने वार करून बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २४ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी घडली. मृतक संजीवनी शंकर भोंडे असे बहिणीचे नाव असून आरोपी भाऊ सुरज शंकर भोंडे असे आहे.माहितीनुसार, पुष्पा शंकर भोंडे (५०) या ठाकरे दवाखान्याजवळील झिंगुजी वॉर्ड येथे मुलगी संजीवनी शंकर भोंडे हिच्यासह वास्तव्यास होत्या. घराच्या अर्ध्या भागात पती शंकर भोंडे व मुलगा सुरज शंकर भोंडे राहत होते. मागील काही महिन्यांपासून घरगुती कारणांवरून कुटुंबात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी दुपारी झालेल्या किरकोळ वादानंतर सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पुन्हा वाद उफाळून आला. या वादातून संतप्त झालेल्या मुलगा सुरज याने घरातून तलवार आणून संजीवनी हिच्यावर वार केल्याचा आरोप आहे.

मानेवर गंभीर वार झाल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. दरम्यान, आई पुष्पा भोंडे यांच्यावरही वार करण्यात आले असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच भद्रावती चे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी धाव घेत पाहणी केली. कौटुंबिक वादाचे भीषण रूप धारण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!