चिमूर शहरात मोठे भूकंप विरोधक भाजप च्या वाटेवर चर्चेला आले उधाण

काँग्रेस पक्षाला खिंडार 

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार ) 

चिमूर : - चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर तसेच त्यांचे लहान बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे चित्र उघड दिसत आहे. आता चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते कोण ठरेल याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागले आहे.काँग्रेस कार्यकर्ते आपला नेता कोणाला बनवेल अशी ठिक - ठिकाणी चर्चा रंगू लागली असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नेतृत्व कोण करणार..? याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.या घटनेमुळे भाजप चे पदाधिकारी तथा कार्यकर्ते एकमेकांशी विरोधी भूमिका निभावीणारे उद्या दिनांक.२६ फेब्रुवारी २०२६ ला मुंबई येथे सकाळी १०:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप पक्षात पक्ष प्रवेश घेणार असून चिमूर विधानसभा क्षेत्रात कशाप्रकारे भाजप मध्ये भूमिका पार पाडतील याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!