मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून,भिसी येथील घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मच्छिंद्रनाथ मेश्राम या ५१ वर्षीय इसमाचा खून त्याच्याच मुलाने केला असल्याची धक्कादायक घटना भिसी नगरपंचायत हद्दीत घडली.

  कु.संदेश मच्छिंद्रनाथ मेश्राम वय २० वर्षे याने  नायलॉनच्या दोरीने गळा आवळून वडील मच्छिंद्रनाथ मेश्राम यांचा खून केला.सदर घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.बापाचा खून केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशन भिसी येथे गेला व जन्मदात्या बापाचा खून केला असल्याची माहिती दिली.

        खून करणाऱ्या मुलाला ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्यासह पोलिस सहकाऱ्यांनी अटक केली असून भांदवी कलम १०३ अन्वये भिसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        यानंतर पोलीस स्टाॅफ घटनास्थळी दाखल झाला व घटनास्थळाचा पंचनामा केलाय व मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम यांच्या बाबत नातेवाईकांकडून सविस्तर माहिती घेतली.

         मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम हे मुळचे सिंदेवाही तालुक्यातील मौजा रत्नापूचे रहिवाशी आहेत.ते २० वर्षांपूर्वी चिमूर तालुक्यातील मौजा भिसी (जुनी) येथे कुटुंबासह राहात होते.

         मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम यांचा स्वभाव भयंकर त्रासदायक असल्याने कुटुंबातील सदस्य व परिसरातील नागरिक वैतागले होते.

                मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपरुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!