महाराष्ट्रातील थकीत कर्जदार शेतकरी कर्जमुक्त होणार





कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर.

मूल(प्रति)

राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी शासनाने "शेतकरी कर्ज निवारण योजना_2026" अमलात आणली असून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी निसर्गाच्या कृपेमुळे कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून स्वावलंबी बनवून आर्थिक परीस्थिती सुधारण्यासाठी सरकारने "शेतकरी कर्ज निवारण योजना_ 2026" ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात अमलात आणली आहे. 

शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने समिती गठित केली असून या समितीमार्फत राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बँकेतर्फे गोळा केली जात आहे. कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून वेळोवेळी सूचना देऊन कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे. कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध करण्यात येत असून लवकरच शासन या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करणार आहे. 

नैसर्गिक आपत्तीत शेतकरी दरवर्षीच सापडत असून याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जात अडकला असून या स्थितीतून कर्जदार शेतकऱ्याला बाहेर काढून त्याला स्वावलंबी करण्यासाठी व त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकून शेतकऱ्यांच्या हितासाठी "शेतकरी कर्ज निवारण योजना_ 2026 अमलात आणली आहे. 

लवकरच, शेतकरी कर्ज निवारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे थकित कर्ज (2020_2025) या वर्षातील माफ करण्याचे शासनाचे धोरण असून त्यासंदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्गातून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!